माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित - bharat ratna
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना गुरूवारी ‘भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मुखर्जी यांना हा पुरस्कार देण्यात आला. यामुळे माजी राष्ट्रपतींना आजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न मिळत असलेला योगायोग पहायला मिळाला. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.