नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सध्या डीप कोमामध्ये असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पूर्ण कोमात; रुग्णालय प्रशासनाची माहिती - प्रणव मुखर्जी शस्त्रक्रिया न्यूज
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात 10 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. ते सध्या पूर्ण कोमात गेले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी यांना श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात 10 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचेही निदान झाले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सध्या मुखर्जी हे पूर्ण कोमात असून डॉक्टरांचे एक पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या कालावधीत देशाचे १३वे राष्ट्रपती होते.