नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज हे महान शासक होते, त्यांची कोणाशाही तुलना करणे चुकीचे आहे, तसेच 'आजके शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.
मागील दोन दिवसांपासून जय भगवान गोयल लिखीत 'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून गदारोळ सुरू आहे. यावर बोलताना, लेखक व प्रकाशकाने संबंधित पुस्तक मागे घेतल्याचे जावडेकर यांनी सांगितले. तसेच यामुळे शिवाजी महाराजांचा वारसा अबाधित राहणार असल्याचे ते म्हणाले.
'आजके शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे. हेही वाचा -'CAA बाबत टीव्हीवर ५ टीकाकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, जनता काय तो निष्कर्ष काढेल'
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना, या पुस्तकाशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
जगाभरातील शिवभक्तांच्या भावना दुखवल्याने लेखक जय भगवान गोयल माफी मागत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आता कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद न करता, हे प्रकरण बंद केले पाहिजे, असे जावडेकर म्हणाले.