महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'प्रजा वेदिका' जमीनदोस्त होणार; जगनमोहन रेड्डींचा आदेश

कृष्णेच्या नदीकाठी 'प्रजा वेदिकाचे' विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा हवाला देत बंगला जमीनदोस्त करण्याचा आदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी दिला आहे.

जगनमोहन रेड्डी

By

Published : Jun 24, 2019, 6:14 PM IST

अमरावती- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सोमवारी माहिती देताना माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना रेड्डी म्हणाले, प्रजा वेदिका हा अवैधरित्या बांधलेला बंगला आहे. कृष्णा नदीकाठी त्याचे विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे.

तेलुगु देसम पक्षाच्या मागील कार्यकाळात माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानासमोर प्रजा वेदिकाचे निर्माण करण्यात आले होते. प्रजा वेदिका टीडीपीच्या अधिकृत बैठकी आणि पक्षाच्या बैठकीसाठी वापरण्यात येत होता. टीडीपीच्या पराभवानंतर चंद्राबाबू नायडू यांनी ५ जून रोजी पत्र लिहित प्रजा वेदिका विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थान म्हणून देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

आंध्रप्रदेश येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत टीडीपीचा दारुण पराभव झाला होता. १७५ जागांच्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने १५१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details