नवी दिल्ली - नथुराम गोडसे यांच्याबद्दलचे वक्तव्य हे माझे वैयक्तिक आहे. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागत असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितले.
माझ्या 'त्या' वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असल्यास माफी मागते - प्रज्ञासिंह ठाकूर - hurt
गांधीजी यांचे देशासाठी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही. पक्षाची जी भूमिका असेल तीच भूमिका माझी असणार असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
मी रोड शोमध्ये होते, त्यावेळी मला भगवा दहशतवादाबाबत प्रश्न विचारण्यात आला. चालता चालता माझ्या तोंडून ते वक्तव्य आले. कुणालाही दुखावण्याची माझी भावना नव्हती. गांधीजी यांचे देशासाठी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही. मी पक्षाचा आदेश मानणारी एक कार्यकर्ता आहे. पक्षाची जी भूमिका असेल तीच भूमिका माझी असणार असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.
भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन होता. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून पक्ष याबाबतचे स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या वक्तव्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जाहीर माफी मागायला हवी, असेही पक्षाकडून प्रज्ञासिंह ठाकूर यांना सांगण्यात आले होते.