पणजी - विद्यामान खासदार केवळ उद्घाटनाच्या फित कापताना दिसतात. जर खासदार म्हणून निवडून आलो तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दर ३ महिन्यांनी भेट देऊन विकास कामांचा आढावा घेईन, असे 'आप'चे उत्तर गोवा उमेदवार प्रदीप पाडगावकर यांनी सांगितले. त्यांनी आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेवारी अर्ज सादर केला.
यावेळी आपचे गोवा संयोजक तथा दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोम्स, वाल्मिकी नाईक आणि अन्य कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. पाडगावकर म्हणाले, खासदार निधीचा वापर हा विकास कामासाठी करून विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार. तसेच रोजगासाठी धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, दक्षिण गोव्याचे उमेदवार एल्वीस गोम्स यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.