महाराष्ट्र

maharashtra

#coronavirus : पीपीई किटची सर्वांनाच आवश्यकता नसते; आरोग्य सेवकांनी घाबरू नये - केंद्र सरकार

By

Published : Apr 10, 2020, 10:15 AM IST

वैयक्तिक संरक्षण उपकरणांची (पीपीई किट) वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने 30 स्वदेशी उत्पादकांसोबत चर्चा केली आहे. तसेच उत्पादनाला देखील सुरुवात केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

personal protection equipment
ppe kit पीपीई

नवी दिल्ली - 'आरोग्य सेवकांनी पीपीईच्या उपलब्धतेबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही. वैयक्तिक संरक्षण उपकरणांची (पीपीई किट) वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने 30 स्वदेशी उत्पादकांसोबत चर्चा केली आहे. तसेच उत्पादनाला देखील सुरुवात झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून 1.7 कोटी पीपीई किट आणि 49 हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर देखील देण्यात आली आहे' अशी माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा...मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे

देशात सध्या सुरू कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गात सध्या तीन वैद्यकीय उपकरणांची जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे एन-95 मास्क, व्हेंटिलेटर आणि पीपीई (वैयक्तिक संरक्षक उपकरणे) किट. मंत्री गट बैठकीत या तिघांवरही चर्चा झाली असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले.

गुरुवारी कोरोनासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलतना आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पीपीई किटची सर्वांनाच आवश्यकता नसते. त्यामुळे आरोग्य सेवकांनी त्याबाबत अधिक घाबरू नये. सरकारने पीपीई, मास्क संदर्भात योग्य ती पाऊले उचलली असून देशातील 30 उत्पादकांसोबत याबाबत चर्चा केली आहे. पीपीई किटच्या वाढत्या मागणीची पुर्तता करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून 1.7 कोटी पीपीई किट आणि 49 हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर देखील देण्यात आली आहे. देशातील डॉक्टर, परिचारिका यांना वरील तिन्ही वैद्यकीय साधनांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता भासत असल्याने सरकार या २० उत्पादकांकडून या साधनांची खरेदी करणार आहे' अशी माहिती सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details