नवी दिल्ली- ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 'आप'चा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन याला अटक करण्यात आली आहे. अंकित यांचे शवविच्छेदन पार पडले असून अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यात त्यांची हत्या झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. फुफ्फुस आणि मेंदूत खोलवर झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
दिल्ली हिंसाचार: आयबी ऑफिसर अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 12 वार.. - nkit sharma who was killed in delhi violence
अंकित यांच्या शरीरावर एकूण 45 जखमा असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाचे अधिकारी असलेले अंकित याचा मृत्यू फुफ्फुस आणि मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे झाला आहे.
अंकित यांच्या शरीरावर एकूण 45 जखमा असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाचे अधिकारी असलेले अंकित याचा मृत्यू फुफ्फुस आणि मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे झाला आहे. एकूण जखमांपैकी 12 जखमा चाकूने वार केल्याने झाल्या आहेत. अंकित यांच्या शरीरावरील जखमा मृत्यू होण्याआधी ताज्या होत्या, असेही अहवालात म्हटले आहे.
या प्रकरणी अटकेत असलेल्या ताहिर हुसेनची कसुन चौकशी करण्यात येत आहे. ताहिर याच्या घरुन दगडांचा साठा, अॅसिड, पेट्रोल बॉम्बचा साठा जप्त करण्यात आला होता. या हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.