महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली'; बिहारमध्ये पोस्टरवॉर - बिहारमध्ये पोस्टरवॉर

बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर-वॉर सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत.

 बिहारमध्ये पोस्टरवॉर
बिहारमध्ये पोस्टरवॉर

By

Published : Jun 7, 2020, 12:52 PM IST

पाटणा - बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर-वॉर सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत. शहरात लागेल्या पोस्टर्सवर 'कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली' असे लिहिले आहे.

संबधित पोस्टरवर लालूप्रसाद दिसत असून त्यांच्यासोबत मोहम्मद शहाबुद्दीन आणि राजवल्लभ यादव आहेत. हे तिघेही थाळ्या वाजवताना दाखवले आहे. पोस्टरवर मोठ्या अक्षरामध्ये 'कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली' असे लिहिले आहे. हे पोस्टर कोणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यापूर्वी राजद नेते तेजस्वी यादव यांनी पाटणा येथील पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोस्टर लावले होते आणि पोस्टरच्या माध्यमातून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित असून जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. ही विधानसभा निवडणूक म्हणजे नितीश कुमार यांची कसोटी असेल. बिहारमध्ये 244 विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात मागील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर 2015मध्ये झाली होती.

विधासनसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. अमित शाह व्हर्च्युअल रॅली घेणार असून त्यासाठी बिहारच्या सर्व जिल्ह्यांत मिळून तब्बल 72 हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. भाजपाकडून आज दुपारी 4 वाजता 'बिहार जनसंवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details