मधेपुरा -कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दैनंदिन मजुरांचे हाल सुरू आहेत. केद्र सरकारने या मजुरांसाठी आवश्यक त्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, अनेक गावात शासनाच्या योजना पोहचल्या नाहीत. त्यामुळे गोरगरींबाच्या घरात दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे.
कोरोना विषाणूमुळे आधीच जनता त्रस्त झाली आहे. त्यात आता ज्यांचे रोजंदारीवर काम आहे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ईटीव्ही भारतने अशा मजूर कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
लॉकडाऊनमुळे गोरगरीबांचे जीवन विस्कळीत, ईटीव्ही भारतजवळ मांडली व्यथा मधुपुरा येथील स्थानिक निवासी ठेला चालक मनोहर मंडल, महादेव मंडल आणि शोभा देवी यांनी आपली परिस्थिती सांगितली. मागच्या 4 दिवसांपासून घरात चुल पेटलेली नाही. खाण्यापिण्याचे हाल होत आहे. अशा परिस्थिती जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यासंबधी पंचायत प्रतिनिधी उमेश यांच्याशी देखील ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले, की मजूर कुटुंबातील सदस्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पदाधिकारी मधेपुरा यांना माहिती देण्यात येईल. तसेच, मजुरांच्या कुटुंबाला अन्नधान्य पुरवठा देखील करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.