महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रदूषणाची पातळी वाढली; पूर्व दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 337 वर - पूर्व दिल्लीचे वायू गुणवत्ता निर्देशांक

दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पूर्व दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 337 वर आहे. नोएडामधील वायू गुणवत्ता निर्देशांक 399 आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) 443 नोंद झाला होता. त्यामुळे आजचा स्तर दिलासादायक असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

दिल्ली प्रदूषण न्यूज
दिल्ली प्रदूषण न्यूज

By

Published : Nov 14, 2020, 11:11 AM IST

नवी दिल्ली - राजधानीत दिवाळी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पूर्व दिल्लीचे वायू गुणवत्ता निर्देशांक 337 वर आहे. नोएडामधील वायू गुणवत्ता निर्देशांक 399 आहे. अंदाजानुसार, आज दिल्लीत ढगाळ वातावरण राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे 38 आणि 12 अंशांच्या आसपास राहील.

दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर पुन्हा खालावला...

दिल्लीच्या अनेक भागांमधील वायु गुणवत्ता निर्देशांक -

ठिकाण वायु गुणवत्ता निर्देशांक(AQI)
पूसा 331
लोधी रोड 316
दिल्ली विद्यापीठ 357
विमानतळ 347
मथुरा रोड 350
आया नगर 326

दरवर्षी हिवाळ्यात दिल्लीतील प्रदुषण धोक्याची पातळी गाठत असते. यावर्षी कोरोनाचा प्रसार आणि हवा प्रदुषण या दोन्हींचा सामना दिल्लीकरांना करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) 443 नोंद झाला होता. त्यामुळे आजचा स्तर दिलासादायक असल्याचेही हवामान विभागाने म्हटलं आहे. तथापि, दिल्लीत 44 हजार 329 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 7 हजार 423 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 4 लाख 23 हजार 78 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

विना वॉल्व्हचे एन-९५ मास्क वापरावे -

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली प्रशासन पाऊले उचलत आहे. दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी लागू केली आहे. हिवाळ्यामध्ये २.५ ते १० पीपीएमपर्यंत प्रदूषण वाढते. अशा परिस्थितीत विना-वॉल्व्हचे एन-९५ मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्लीकरांना दिला आहे. हिवाळ्यात दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -सीमेवर तैनात सुरक्षा दलाच्या जवानांची उत्साहात दिवाळी

ABOUT THE AUTHOR

...view details