महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊनचा असाही फायदा; प्रदूषणाच्या डेंजर झोनमधून बिहार बाहेर - Air Quality Index

काही महिन्यांपूर्वी पाटना शहरातील प्रदूषण प्रचंड वाढले होते. देशातील सर्वात जास्त प्रदुषित शहरांच्या यादीत पटन्याचा समावेश झाला होता. मात्र, आता लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ झाले आहे. डेंजर झोनमधून बाहेर पडून हवेची गुणवत्ता सामान्य झाली आहे.

Atmosphere
वातावरण

By

Published : Apr 23, 2020, 9:57 AM IST

पाटना - बिहारमध्ये लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बसून त्रस्त झाले आहेत. मात्र, हा लॉकडाऊन पटना शहरासाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे. मागील काही दिवसात शहरातील प्रदुषणात कमालीची घट झाली असून वातावरण शुद्ध झाले आहे. त्यामुळे कोरोनानंतरही आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.

प्रदूषणाच्या डेंजर झोनमधून बिहार बाहेर

काही महिन्यांपूर्वी पटना शहरातील प्रदूषण प्रचंड वाढले होते. देशातील सर्वात जास्त प्रदुषित शहरांच्या यादीत पटन्याचा समावेश झाला होता. मात्र, आता लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ झाले आहे. डेंजर झोनमधून बाहेर पडून हवेची गुणवत्ता सामान्य झाली आहे.

मागच्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत प्रदूषणाची पातळी ५०० पर्यंत पोहचली होती. मात्र, आता लॉकडाऊन झाल्यानंतर हीच पातळी १२० पर्यंत खाली आली आहे. दिवाळीच्या कालावधीत बिहारमध्ये प्रदूषणाची पातळी वाढते.

१६ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत विविध शहरातील हवेचा एयर क्वालिटी इंडेक्स -

Date Patna gaya muzaffarpur
16 138 117 94
17 167 76 95
18 164 57 109
19 170 89
20 134 88
21 239 158 228
22 122 119 107
23 112 126 241
24 112 144 250
25 96 136 273
26 112 75 275
27 49 81 80
28 54 88 256
29 56 111 176
30 56 114 153
31 80 144

प्रदूषणामुळे झालेले मृत्यू -

बिहारमधील गया आणि मुजफ्फरपूर या दोन शहरांत २००० ते १०१७ या कालावधील प्रदूषणामुळे ७१० मृत्यू झाले आहेत. एनव्हायर्रमेंट अँड एनर्जी डेव्हलपमेंट या संस्थेच्या माहितीनुसार २०१७ या एका वर्षात बिहार राज्यात प्रदूषणामुळे 91 हजार 458 लोकांचा मृत्यू झाला. यात 14 हजार 929 बालकांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details