पाटणा - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने व कंपन्या बंद असल्यामुळे गंगा नदीच्या प्रदुषणात घट झाली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे गंगा नदी अधिक स्वच्छ झाल्याची दिसत आहे. तसेच नागरिक देखील आता नदीत कचरा टाकताना दिसत नाहीत.
लॉकडाऊन इफेक्ट : गंगा नदीच्या प्रदुषणात घट हेही वाचा...अखेर दिवे लावलेच ! पंतप्रधानांचे आवाहन; एकजुटीचे दिवे लावण्याचा नादात दोन घरे पेटली
गंगाजल होतंय अधिक स्वच्छ...
लॉकडाऊन दरम्यान कंपन्या बंद पडल्यामुळे गंगा नदीचे पाणी स्वच्छ होत आहे, असे गंगा स्वच्छता अभियान चालवणारे सामाजिक कार्यकर्ते गुड्डू बाबा यांनी म्हटले आहे.
या गोष्टींवर सरकारने लगेचच कारवाई करावी...
गंगा नदीत सोडले जाणारे सुमारे 74 टक्के सांडपाणी हे प्रक्रिया न करता सोडले जाते. अशा सांडपाण्यामुळेच गंगा नदीचे सर्वाधिक प्रदुषण होत आहे. सरकारने असे विना प्रक्रिया सांडपाणी गंगेत सोडण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गुड्डू बाबा यांनी केली आहे.