रांची -झारखंडमध्ये आज सोमवार 16 डिसेंबर रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. याबाबत प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यात 4 जिल्ह्यातील 15 विधानसभा जागासाठी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली.
हेही वाचा... #CAA आंदोलन : अलिगढमधील इंटरनेट सेवा बंद; मुस्लीम विद्यापीठाच्या सुट्ट्याही तातडीने जाहीर
पंतप्रधानांचे मतदारांना आवाहन..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी झारखंडमध्ये होत असलेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानात सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा... नागरिकत्व कायदा न्यायालयात टिकल्यानंतर राज्यात लागू करण्याविषयी विचार करू - उद्धव ठाकरे
राज्य निवडणूक अधिकारी विनय कुमार चौबे म्हणाले की, निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 221 उमेदवारांच्या भवितव्याच्या निर्णयावर ईव्हीएमच्या माध्यमातून शिक्कामोर्तब होईल, त्यामध्ये 198 पुरुष उमेदवार, 22 महिला उमेदवार आणि एक तृतीय लिंग उमेदवारही रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी 47 लाख 85 हजार 9 मतदार त्यांच्या मतांचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथे 25,40,794 पुरुष उमेदवार आहेत, महिला मतदारांची संख्या 22,44,134 आहे आणि तृतीय लिंग मतदारांची संख्या 81 आहे. या विधानसभेत एकूण 95,795 मतदार प्रथमच मतदान करतील.