महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसने मागील निवडणुकांमधून काहीच धडा घेतला नाही, जगदीश शर्मांचा पक्षाला घरचा आहेर.. - दिल्ली निकाल लाईव्ह

काँग्रेसने मागच्या निवडणुकीतून काहीच धडा घेतला नाही, अशी टीका काँग्रेसचेच नेते जगदीश शर्मा यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, की पक्षाने योग्य नेत्यांना उमेदवारी न दिल्यामुळेच आज पक्षाची ही अवस्था झाली आहे. मागील निवडणुकांमध्ये सपशेल पडलेल्या नेत्यांनाच पुन्हा तिकीट देऊन पक्षाने फार मोठी चूक केली आहे.

Delhi Elections LIVE
काँग्रेसने मागील निवडणुकांमधून काहीच धडा घेतला नाही, जगदीश शर्मांचा पक्षाला घरचा आहेर..

By

Published : Feb 11, 2020, 12:13 PM IST

नवी दिल्ली -काँग्रेसने मागच्या निवडणुकीतून काहीच धडा घेतला नाही, अशी टीका काँग्रेसचेच नेते जगदीश शर्मा यांनी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली असून, काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली.

काँग्रेसने मागील निवडणुकांमधून काहीच धडा घेतला नाही, जगदीश शर्मांचा पक्षाला घरचा आहेर..

ते पुढे म्हणाले, की पक्षाने योग्य नेत्यांना उमेदवारी न दिल्यामुळेच आज पक्षाची ही अवस्था झाली आहे. मागील निवडणुकांमध्ये सपशेल पडलेल्या नेत्यांनाच पुन्हा तिकीट देऊन पक्षाने फार मोठी चूक केली आहे. यावरून त्यांनी काँग्रेस नेते पी. सी. छाकोंवरही टीका केली. ते म्हणाले, यावर्षीही तिकीटांचा बाजार झाला होता. त्यामुळे छाकोंनी राजीनामा द्यायला हवा. त्यांनी राजीनामा न दिल्यास, पक्षानेच कडक कारवाई करत त्यांची हकालपट्टी करायला हवी.

आज सुरू असलेल्या दिल्लीच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. सुरूवातीचे आकडे पाहता, आतपर्यंत आम आदमी पक्ष ५६ जागांवर आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्ष १४ जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा : #DelhiElections2020Live : आप 54 तर भाजप 15 जागांवर आघाडीवर

ABOUT THE AUTHOR

...view details