सासाराम -बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबण्याच्या काही तास अगोदर महागटबंधनचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी जातीय पत्ते खेळले आहेत. डेहरी येथील सभेत त्यांनी म्हटले, की नितीशकुमारांच्या राज्यात लोकप्रतिनिधी आणि सर्व सामान्य माणसांना काही किंमत नाही. लालूंच्या राज्यात गरीब साहेबांसमोर ताठ मानाने उभारु शकत असत.
बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार तेजस्वी यादव खुपच वेगाने करत आहेत. रोहतास जिल्ह्यातील डिहरी विधानसभा मतदारसंघातील सभेत त्यांच्या जातीय समीकरणे जोडण्याच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी जनता दल यूनायटेडने त्यांना अडचणीत आणले आहे. तसेच त्यांना मताच्या ध्रुवीकरणासाठी जातीय पत्ते खेळल्याचा आरोप केला आहे.
नितीशकुमारांच्या राज्यात रोजगार निर्मिती नाही