नवी दिल्ली -देशाच्या राजधानीमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. दिल्लीच्या मॉडेल टाऊन पोलीस कॉलनीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर परिसरातील ब्लॉक क्रमांक 3मध्ये राहाणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले.
आतापर्यंत दिल्लीमध्ये 7 पोलीस कर्चमाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. मॉडेल कॉलनीत राहणाऱ्या पोलीस कुटुंबातील त्या कर्मचाऱ्याला, पत्नीला आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले.