भोपाळ - पाकिस्तानात घुसून लढाऊ विमानाचा पाडाव करणारे भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन भारतासाठी हिरो बनले आहेत. देशातील अनेकांनी त्यांच्या शोर्याचे कौतुक तर केलेच परंतु, त्यांच्या मिशांच्या स्टाईलला लोकप्रियता मिळवून दिली आहे. भोपाळमधील एका पोलिसाने अभिनंदनच्या मिशांची कॉपी करताना त्यांना देशाचे खरे हिरो म्हटले आहे.
विंग कमांडर अभिनंदर खरे हिरो, त्यामुळे त्यांची स्टाईल कॉपी केली - भोपाल
मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील पोलीस कैलाश पवार यांच्या मिशा आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशा एकसारख्याच दिसतात. मला नकली हिरोंना कॉपी करण्यापेक्षा देशाचे खरे हिरो असणारे अभिनंदन यांना कॉपी करणे आवडले, असे कैलाश पवार म्हणाले.
मध्यप्रदेशातील भोपाळ येथील पोलीस कैलाश पवार यांच्या मिशा आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशा एकसारख्याच दिसतात. विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशांची कॉपी करणारे पोलीस कैलाश पवार म्हणाले, आजकालचे युवक चित्रपटात काम करणाऱ्या आभासी आयुष्यातील हिरो किंवा नकली हिरोंना कॉपी करतात. परंतु, मला असल्या नकली हिरोंना कॉपी करण्यापेक्षा देशाचे खरे हिरो असणारे अभिनंदन यांना कॉपी करणे आवडले. अभिनंदन यांनी लष्करी ऑपरेशन पार पाडताना देशवासियांमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागृत करुन ते देशाचे खरे हिरो असल्याचे दाखवून दिले. यामुळे मला अभिनंदन यांची मिशांची स्टाईल करणे आवडते.
पाकिस्तानच्या लष्करी विमानाविरुद्ध लढाई करताना विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिग-२१ विमानाचा अपघात झाला होता. अपघातांनतर अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. यामुळे पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना बंदी बनवले होते. परंतु, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव टाकल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना १ मार्चला सोडले होते.