महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली पोलिसांचे कोरोना हेल्मेट; लॉकडाऊनमध्ये घरीच राहण्याचे आवाहन - दिल्ली कोरोना

वाहतूक पोलिसांनी कोरोना विषाणुप्रमाणे दिसणारे हेल्मेट तयार करून ते परिधान केले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना पोलीस घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत. सोशल मीडियावर पोलिसांच्या सर्जनशीलतेचे कौतुक होत आहे.

दिल्ली पोलिसांचे कोरोना हेल्मेट; लॉकडाऊनमध्ये घरीच राहण्याचे आवाहन
दिल्ली पोलिसांचे कोरोना हेल्मेट; लॉकडाऊनमध्ये घरीच राहण्याचे आवाहन

By

Published : Apr 11, 2020, 3:04 PM IST

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पोलीस जनजागृती करत आहेत. प्रत्येक राज्यातील पोलीस विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी अनोख्या पद्धतीने कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. ट्राफिक पोलिसांनी कोरोना विषाणुप्रमाणे दिसणारे हेल्मेट तयार करून ते परिधान केले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना पोलीस घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या कोरोना हेल्मेटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या २४ तासांमध्ये देशात १,०३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७,४४७ वर पोहोचली आहे. तर देशातील कोरोनाच्या बळींची संख्या २३९ वर पोहोचली आहे.राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details