नवी दिल्ली- जेएनयू येथे ५ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात शहरातील विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रपती भवनावर आपला मोर्चा वळवला. दरम्यान, राष्ट्रपती भवनाकडे जात असलेल्या महिला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी वेगळे करण्याचे प्रयत्न केले.
राष्ट्रपती भवन मोर्चा; महिला आंदोलनकर्त्यांना वेगळे करण्याचा पोलिसांनी केला प्रयत्न - rashtrapati bhawan protest jnu
जेएनयू हिंसाचाराप्रकरणी विद्यार्थी विद्यापीठाच्या कुलगुरुंना पदावरुन हटवण्याची मागणी करत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले आणि आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
महिला आंदोलनकर्त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करताना पोलीस
जेएनयू हिंसाचाराप्रकरणी विद्यार्थी विद्यापीठाच्या कुलगुरुंना पदावरुन हटवण्याची मागणी करत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले आणि आंदोलनात भंग पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आंदोलकांना मोर्चातून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेत काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.