महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमली पदार्थ तस्करांच्या मागावर मध्यप्रदेश पोलीस; गुजरात, महाराष्ट्रातील गँगवर नजर - इंदौर अमली पदार्थ तस्करी प्रकरण

मध्यप्रदेश पोलिसांनी ७० किलो एमडी हे अमली पदार्थ जप्त केले होते. त्याचा तपास करताना पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागत गेले. तशी अटक झालेल्यांची माहिती मिळू लागली. अनेक ड्रग्ज माफिया टोळ्यांत सहभागी असणाऱ्यांना पोलिसांनी जप्त केले आहे.

इंदौर पोलीस कारवाई करताना
इंदौर पोलीस कारवाई करताना

By

Published : Feb 4, 2021, 2:07 PM IST

भोपाळ - अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट उघड करण्यासाठी मध्यप्रदेश पोलीस मागील काही महिन्यांपासून गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात छापेमारी करत असून यात त्यांना मोठे यशही आले आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी २० आरोपींना अटक केली असून अनेकजण निशाण्यावर आहेत. गुजरात, राजस्थानसह मुंबईत इंदौर पोलिसांचे पथक ठाण मांडून आहे.

मध्यप्रदेश पोलिसांनी ७० किलो एमडी हे अमली पदार्थ जप्त केले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागत गेले. अटक केलेल्या हस्तकांकडून पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. ड्रग्ज माफियांच्या टोळ्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी नुकतेच राजस्थानातील अजमेर येथून दोन सख्या भावांना अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली आहे.

गुजरात आणि महाराष्ट्रातून आरोपींना अटक -

इंदौर पोलीस गुन्हे शाखा

मागील काही दिवसांपूर्वी फिरोज आणि लाला या तस्करांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आणखी काही आरोपींना अटक करण्यासाठी इतर राज्यात धाडी टाकत आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक शहरात पोलिसांची पथके रवाना झाली असून गुप्त माहितीच्या आधारे तस्करांवर पाळत ठेवून आहेत. लवकरच मोठी सफलता मिळणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील फिरोज गँग आणि गुजरात सीमेवरील लाला गँगबरोबर सरदार खान या आरोपीचे संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांना तपासादरम्यान अनेक पुरावे हाती लागले आहेत.

इंदौर बनला ड्रग्ज तस्करांचा अड्डा -

मागील काही दिवसांपूर्वी इंदौर शहरात अमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे समोर आले आहेत. पोलिसांनी नुकतेच ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. तसेच ५ जानेवारीला पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच तेलंगानातील हैदराबादमधूनही काही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर इंदौरमधील देवास शहरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ७० किलो एमडीएमए ताब्यात घेतले, या पदार्थांची बाजारात किंमत ७० कोटी होती.

मध्यप्रदेशात पकडण्यात आलेल्या आरोपींच्या माहितीनुसार इंदौर पोलिसांनी मुंबईतील कमाठीपूरा भागातील ड्रग्ज माफिया सलीम लाला याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, तो फरार झाला. सध्या पोलीस विविध ठिकाणी छापे मारून आरोपींचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details