महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार : ओळख पटवण्यासाठी स्मशानातून माघारी आणला अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह - बिहार बातमी

बिहारमधील बक्सार जिल्ह्यात ३ डिसेंबरला महिलेचा अर्ध जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे.

baxar news
मृतदेह माघारी आणताना

By

Published : Dec 6, 2019, 9:50 PM IST

पटना - बिहारमधील बक्सार जिल्ह्यात ३ डिसेंबरला महिलेचा अर्ध जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी स्मशानात नेण्यात आलेला मृतदेह पुन्हा माघारी आणण्यात आले आहे. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी आणखी वेळ देण्यात आला आहे.

महिलेचे अर्ध जळालेलं शव ओळख पटवण्यासाठी स्नशानातून आणले माघारी
साधारणत: ७२ तासांच्या आत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावा लागतो. मात्र, मृतदेह आणखी २४ तास ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओळख पटवण्यासाठी अनेक नागरिक येत आहेत. त्यामुळे मृतदेहास आणखी काळ ठेवण्यात येणार आहे, असे बक्सार पोलीस प्रमुख उपेंद्रनाथ वर्मा यांनी सांगितले.3 डिसेंबरला सापडला होता अर्धजळालेला मृतदेह३ डिसेंबरला बक्सार जिल्ह्यातील इटाढी पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये अर्धा जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी अजूनही तपास सुरु आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला होता. मात्र, ओळख पटवण्यासाठी पुन्हा माघारी आणण्यात आला आहे. ही घटना हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर महिला बलात्कार आणि हत्या प्रकरणासारखीच असल्याची चर्चा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details