नवी दिल्ली - छत्रपूर येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत ९० दारूच्या बाटल्या, ५ लाख ४३ हजारांची रोकड आणि ३८ ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. दिल्ली पोलीस आणि दिल्ली उत्पादन शुल्काने छत्रपूर येथे सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकत ही कारवाई केली.
दिल्लीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; ९० दारू बाटल्यासह ५ लाखाची रोकड आणि ड्रग्जच्या गोळ्या जप्त - नवी दिल्ली
रेव्ह पार्टीतून जवळपास ९५ देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या आणि ५ लाख ४३ हजार रुपये रक्कम जप्त केली आहे. यासोबतच १७ डार्क ब्राउन आणि २१ गुलाबी अशा मिळून ३८ ड्रग्जच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परविंदर सिंग यांनी कारवाईची माहिती देताना सांगितले, की जवळपास ९५ देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या आणि ५ लाख ४३ हजार रुपये रक्कम जप्त केली आहे. यासोबतच १७ डार्क ब्राउन आणि २१ गुलाबी अशा मिळून ३८ ड्रग्जच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी तपास करताना प्रत्येकाकडून ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते. आयोजकांपैकी १ असलेल्या पुलकीतने मद्य विक्रीचा (पी १०) परवाना असल्याचे सांगितले. परंतु, तपासात त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात व्हिस्की आणि वोडकासारखे मद्य सापडले.
पोलिसांनी कारवाई करताना, पुलकित, कॅशिअर आणि ज्या गाडीत मद्य सापडले आहे. त्याच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. ही पार्टी गौरव मावी आणि अली यांनी आयोजित केली होती. दोघेही नोएडाचे राहिवासी असून ते बिझनेस प्रॉपर्टीचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर दोघेही फरार झाले. नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टंस (एनडीपीएस) अॅक्ट १९८५ नुसार १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.