महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने कर्करोग ग्रस्तांसाठी केसांचे दान, पाहा व्हिडिओ - केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यात पोलीस अधिकारी अपर्णा लवकुमा

केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यात पोलीस अधिकारी अपर्णा लवकुमार या महिलनं कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आपले मुंडन करून घेतले आहे.

पोलीस अधिकारी अपर्णा लवकुमार

By

Published : Sep 30, 2019, 11:59 AM IST

थ्रिसूर - केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यात पोलीस अधिकारी अपर्णा लवकुमार या महिलनं कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आपले मुंडन करून घेतले आहे. विग तयार करण्यासाठी त्यांनी आपले लांब आणि सुंदर काळे केस दान केले आहेत.

केरळ : महिला पोलीस अधिकाऱयाने कर्करोग ग्रस्तांसाठी दान केले आपले केस, पाहा व्हिडिओ


महिलांसाठी त्याचे केस खुप प्रिय असतात. त्यांच्या सुंदरतेत केसामुळे भर पडते. असे असून ही अपर्णा यांनी आपले मुंडण करुन घेतले आहे. दोन वर्षापुर्वी मी एका कर्करोगामधून बचावलेल्या एका व्यक्तीला पाहिले होते. त्याच्या डोक्यावरील केस कायमस्वरूपी नष्ट झाले होते. त्याची अवस्था पाहून मी केस दान करण्याचा निर्णय घेतला. मी जे केले आहे. त्यात कौतूक करण्यासारखे काहीच नाही. डोक्यावर केस दोन वर्षामध्ये पुन्हा येतील, असे त्या म्हणाल्या आहेत.

महिला पोलीस अधिकाऱयाने कर्करोग ग्रस्तांसाठी दान केले आपले केस


यापूर्वी एका रुग्णालयात त्यांनी एका कुटुंबाला मदत केली होती. ६० हजार रुपये न भरल्यामुळे रुग्णालय त्या कुटुंबातील सदस्याला घरी सोडत नव्हते. यावेळी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या दान केल्या होत्या. अपर्णा यांना दोन मुली असून लग्नानंतर त्याच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर त्यानी आपल्या मुलींचे पालन पोषण केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details