रायसेन -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या प्रकारांनी घरीच थांबण्याविषयी आवाहन केले जात आहे. रायसेन येथेही पोलिसांनी अनोख्या पद्धतीने लोकांकडून लॉकडाउनचे पालन करवून घेतले. पोलिसांनी गस्तीदरम्यान गाणी गात लोकांना घरी थांबण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या वाहनाचे चालक विवेक प्रेम यांनी अनोख्या अंदाजात गाणे गायले. त्यांच्या या युक्तीचे पोलीस अधीक्षकांनीही कौतुक केले.
कोरोनापासून सावधान! गाणी गात पोलिसांनी केले आवाहन, लोकांनी केला पुष्पवर्षाव..
पोलिसांनी गस्तीदरम्यान गाणी गात लोकांना घरी थांबण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या वाहनाचे चालक विवेक प्रेम यांनी अनोख्या अंदाजात गाणे गायले. त्यांच्या या युक्तीचे पोलीस अधीक्षकांनीही कौतुक केले.
कोरोनापासून सावधान
पोलिसांवर फुलांचा वर्षाव
शहरातील शीतल सिटी येथे पोलीस पोहोचताच कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या पुष्पवृष्टी करत स्वागत केले. तसेच, कोरोनाविरोधातील या लढाईत आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन सर्व लोकांनी दिले. भारतातून कोरोनाला परतवून लावू, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. या वेळी, इस मौके पर रायसेनचे ठाणे प्रभारी जगदीश सिंग सिद्धू यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.