रायपूर -भाजप नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे जावई डॉ. पुनीत गुप्ता यांच्या विरोधात रायपूर पोलिसांनी 'लुक आऊट नोटीस' जारी केली आहे. जवळपास ५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भाजपसाठी मोठी डोकेदुखी होण्याचे कारण होऊ शकते.
पुनीत गुप्ता हे रायपूर येथे सरकारी रुग्णालयामध्ये अधीक्षक होते. त्यावेळी त्यांनी तेथे ५० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी २ नोटीस पाठवल्यावरही गुप्तांकडून काहीच उत्तर न आल्यामुळे लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. गुप्तांच्या विरोधात १५ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला होता.