नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोड येथील घरात चोरी प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी विष्णू कुमार वर्मा या आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. १६ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी घरकाम करणाऱ्या आरोपीने त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंसह एक हार्ड डिस्क चोरी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी चोरी, आरोपी अटकेत
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मुंबईतील नेपियन्सी रोड येथील घरात चोरी प्रकार घडला होता.याप्रकरणी पोलिसांनी विष्णू कुमार वर्मा या आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे.
चोरीच्या दिवशी पियुष गोयल हे दिल्लीत होते. तर त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. ही संधी साधून आरोपी विष्णू याने पियुष गोयल यांच्या घरात चोरी केली आहे. या संदर्भांत मुंबई पोलिसांच्या गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.
पोलीस तपासात आरोपी विष्णू हा फरार असल्याचे समोर आले. या दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो दिल्लीत असल्याचे कळल्यावर तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी बुधवारी त्याला दिल्लीतून अटक केली आहे. केंद्रीय मंत्र्याच्या घरात मौल्यवान वस्तूसह संगणकाची हार्डडिस्क चोरणाऱ्या या आरोपीच्या विरोधात पोलिसांनी आयटी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.