तेलंगणा : टीआरएस कार्यकर्त्यांची गुंडगिरी, पोलिसांना काठ्यांनी मारहाण
मोठ्या संख्येने टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालत त्यांच्यावर हल्ला चढवला, असे या व्हिडिओत दिसत आहे. ट्रॅक्टरवर एक महिला पोलीस असून आक्रमक कार्यकर्त्यांनी तिलाही जबर मारहाण केल्याचे यात दिसत आहे.
महिला पोलिसाला मारहाण
हैदराबाद - तेलंगणातील कोमारा भीम असीफाबाद जिल्ह्यात टीआरएसच्या (तेलंगाना राष्ट्रीय समिती) कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. त्यांनी पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना काठ्यांनी जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात एक महिला पोलीस जखमी झाली आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.