बिजनौर-जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात तबलिगी जमातीच्या विदेशी नागरिकांनी मनपसंद जेवण न मिळाल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले होते. याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रसासनाने रुग्णालयात पोलीस तैनात केले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि विगलगीकरण कक्षाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतर कोणताही व्यक्ती या वार्ड जवळ जाऊ नये यासाठी रुग्णालयाला पोलीस छावणीचे रुप देण्यात आले आहे.
तबलिगी जमातीच्या लोकांचे रुग्णालय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन; रुग्णालयाला छावणीचे रुप - तबलिगी जमात
रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि विगलगीकरण कक्षाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतर कोणताही व्यक्ती या वार्डजवळ जाऊ नये यासाठी रुग्णालयाला पोलीस छावणीचे रुप देण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात असलेल्या इंडोनेशियाच्या तबलिगी जमातीच्या 8 विदेशी नागरिकांनी रुगणालयातील कर्मचाऱ्यांशी चांगले जेवण न मिळाल्यामुळे गैरवर्तन केले होते. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयात विदेशी नागरिकांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
तबलिगी जमातीच्या लोकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याची घटना माध्यमामध्ये पसरल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.