चंदीगड- कोरोनामुळे शहरात कडेकोट लॉकडाऊन आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी पोलिसांकडून शहरात गस्त घालत आहेत. गस्तीदरम्यान पोलिसांनी अनेकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. पण चंदीगडच्या सेक्टर-२३ मध्ये एक अजब घटना समोर आली. येथील एक व्यक्ती घराबाहेर पडून चक्क पिंजऱ्यात अडकलेल्या उंदराला बाहेर सोडायला निघालेला आढळून आला. हे पाहून त्या वक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घरात उंदिर देत होते त्रास...म्हणून लॉकडाऊनची पर्वा न करता तो पडला बाहेर, अन..... - उंदीर सोडणारा अटकेत चंदीगड
घरात असलेल्या पिंजऱ्यात एक उंदीर अडकला होता. या उंदराला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासाठी एक व्यक्ती लॉकडाऊन तोडून घरा बाहेर पडला. मात्र ही व्यक्ती पोलिसांच्या नजरेत पडताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या घरात असलेल्या पिंजऱ्यात एक उंदिर अडकला होता. त्यामुळे त्या उंदराचा घरातल्यांना त्रास होत होता. मग काय हे महाशय त्या उंदराला मुक्त करण्यासाठी घरा बाहेर निघाले. पण त्यांचे नशिब खराब. उंदराला सोडून येत असतानाच त्यांच्यावर पोलिसांच्या गस्ती पथकाची नजर पडली. मग...विचापूस सुरू...महाशयांनीही उंदराला सोडण्यासाठी बाहेर आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही मग आपल्या स्टाईलमध्ये, " तू उंदराला सोडून आलास, आता गाडीत बस " असे सांगून ताब्यात घेतले. लॉकडाऊनचा वेगवेगळ्या प्रकारे भंग करणारी अनेक उदाहरणे देशात समोर आली आहेत. मात्र उंदराला सोडण्यासाठी लॉकडाऊनचा भंग करणारे हे देशातील पहिलेच उदाहरण ठरावे. दरम्यान आपल्याला ताब्यात घेतले असल्याचे आपल्या कुटुंबीयांनाही माहित नसल्याचे संबधित व्यक्तीने सांगितले आहे. शिवाय आपल्या कुटुंबियांना अजूनही आपण उंदिर सोडण्यासाठीच बाहेर गेलो असल्याचे वाटत असेल असेही तो म्हणाला.
हेही वाचा-हैदराबादमध्ये अडकलेले हरियाणाचे १,२०० कामगार विशेष रेल्वेने घरी रवाना..