नवी दिल्ली- निजामुद्दीनमध्ये असलेल्या 'मरकझ'मधून पोलीस आणि प्रशासनाने 2 हजार 300 हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. या कारवाईत सामील झालेल्या निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या 11 पोलिसांनी मुंडण केले आहे. त्याचबरोबर 7 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
- पोलिस कर्मचार्यांनी बजावली महत्वाची भूमिका -
मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन स्थित 'मरकझ'मधून लोकांना बाहेर काढण्याचे रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. हे काम सोमवारी व मंगळवारीही झाले. एकीकडे दिल्ली सरकार या लोकांना बाहेर काढत असताना त्यामध्ये निजामुद्दीन पोलीस ठाण्याचे पोलीसही त्यामध्ये सहभागी होते. या कारवाईत पोलीस कर्मचार्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
- 11 पोलिसांनी केले मुंडण -