सिलिगुडी - पोलिसांनी शहरात गेल्या वर्षभरापासून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी माहितीच्या आधारे शनिवारी रात्री धाड टाकताना सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी ६ महिलांसह १० जणांना अटक केली आहे. तर, ६६ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
सिलिगुडी : पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ महिलांसह १० जणांना अटक - न्यायालयीन कोठडी
शहरातील हाकिमपुरा भागातील एका फ्लॅटमध्ये साबित्री घोष आणि तिचा पती शोंभू घोष गेल्या वर्षभरापासून सेक्स रॅकेट चालवत होते.
![सिलिगुडी : पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ महिलांसह १० जणांना अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3972947-thumbnail-3x2-siliguri.jpg)
शहरातील हाकिमपुरा भागातील एका फ्लॅटमध्ये साबित्री घोष आणि तिचा पती शोंभू घोष गेल्या वर्षभरापासून सेक्स रॅकेट चालवत होते. यासाठी ते बिहार आणि सिलिगुडीतील महिला आणि पुरुषांचा वापर करत होते. पोलिसांना घटनास्थळी ६६ हजार रकमेसह महिलांचे काही आक्षेपार्ह छायाचित्रेही जप्त केली आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना आज (रविवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पती-पत्नीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, इतर ८ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.