महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कानपूर चकमक प्रकरण: तीन आरोपी अटकेत

कानपूर येथील चकमक प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 7, 2020, 4:02 AM IST

कानपूर (उत्तर प्रदेश) -कानपूर येथील चकमक प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सुरेश वर्मा, विकासच्या घरात राहणाऱ्या रेखा और क्षमा दुबे ज्या विकास दुबे यांच्या सुना आहेत. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुरेश वर्मा हा घटनेच्यावेळी घटनास्थळावरील हल्लेखोरांना प्रोत्साहन देत होता व पोलिसांच्या लपण्याच्या जागांची माहितीही देत होता.

रेखा दयाशंकर अग्निहोत्री हीने पोलिसांच्या येण्याची माहिती हल्लेखोरांनी दिली. पोलिसांनी प्राण वाचविण्यासाठी दार ठोठावल्यास क्षमा हीने दार न उघडता छतावर असलेल्या हल्लेखोरांना याची माहिती दिली.

विकास दुबेच्या पत्नीचा शोध सुरू

बिकरू गावातील एका पोलीस अधिकाऱ्यांसह 8 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करुन फरार झालेला मुख्य आरोपी विकास दुबे याची पत्नी ऋचा दुबेचा शोध पोलीस घेत आहे. यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापेमारी करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 जुलैला रात्री दोन वाजता विकास दुबेने पत्नी ऋचा दुबेला फोन करुन पळून जाण्यास सांगितले. त्यानंतर ऋचा आपल्या मुलाला घेऊन पसार झाली. ऋचा ही विकास दुबेच्या सर्व गुन्ह्याची साक्षीदार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

काय घडली होती घटना?

कानपूर जिल्ह्यातील बिकारु गावात राहणारा विकास दुबे हा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर 60 गुन्हे दाखल आहेत. राज्यमंंत्र्याची हत्या केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. शुक्रवारी (दि. 3 जुलै) रात्री पोलिसांचे पथक दुबेला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. पोलीस येत असल्याची त्याला आधीच खबऱ्याने दिली होती. त्यामुळे तो त्याच्या साथीदारांसह पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता.

घराच्या गेटसमोर त्याने जेसीबी आणून उभे केले होते. तसेच त्याचे साथीदार छतावर बंदुका घेवून थांबले होते. पोलीस पथक गेटवर येताच गुंडांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. या घटनेनंतर विकास दुबे साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला. दुबे हा कुख्यात गुंड असून त्याचे राजकारणी आणि पोलिसांशीही संबध आहेत, अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा -..आता महाराष्ट्रातून कर्नाटकात परतणाऱ्या नागरिकांना 'इतके' दिवस राहावे लागणार होम क्वारंटाईन

ABOUT THE AUTHOR

...view details