महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उरणच्या खोपटा पुलाखाली दहशतवादाशी संबंधित मजकूर लिहणारा पोलिसांच्या ताब्यात

अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख (३३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण या कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून १२ जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

आतंक पसरवणारा मजकूर

By

Published : Jun 6, 2019, 9:09 PM IST

Updated : Jun 6, 2019, 9:22 PM IST

रायगड - जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये दहशतवादाशी संबंधित मजकूर लिहिणारा ७२ तासात पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख (३३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. आज ६ जून रोजी उरण न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. त्याच्यावर १५३ अ/ब तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण या कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून १२ जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

उरण येथील खोपटा पूलाखाली लिहिलेला मजकूर


उरणच्या खोपटा खाडीवर असणाऱ्या पुलाखाली आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याची माहिती पोलिसांना २ जूनला मिळाली होती. पोलिसांनी माहिती मिळताच यंत्रणा कामाला लागली. हा मजकूर अतिरेकी संघटनेकडून लिहिण्यात आला असल्याचे प्राथमिक अंदाज लावण्यात येत होता. पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता.

अमीर शेख हा मूळ सिद्धार्थ नगर, उत्तरप्रदेश येथील राहणारा आहे. मागील १० वर्षांपासून तो खोपटा येथे भाडेकरू म्हणून रहात होता. याबाबत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा संदेश का व कशासाठी लिहिला आहे. याबाबत माहिती पोलिसांकडून समजलेली नाही.

Last Updated : Jun 6, 2019, 9:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details