प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तीन संशयित दहशतवादी ताब्यात, शहरात 'हाय अलर्ट'
मागील गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिस संघटनेशी संबधीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यानंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
नवी दिल्ली - राजधानीमध्ये दोन आठवड्यांवर आलेल्या प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसही एक महिन्यापेक्षा कमी वेळ राहिला आहे. अशातच दिल्लीमध्ये इसिस संघटनेशी संबधित तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ऊभे राहिले आहे.
पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिस संघटनेशी संबधित तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दिल्लीतील वजीराबाद भागात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तिघांना अटक केली, त्यांच्याकडून तीन पिस्तूलही ताब्यात घेतले आहेत.