हैदराबाद - आजच्या युगात प्रमाणिक अधिकारी मिळणे कठीणच झाले आहे. मात्र तेलंगाणामध्ये असा एक अधिकारी आहे. ज्याने आपल्या कार्यालयातच 'मी प्रामाणिक आहे', असा मोठा फलक लावला आहे.
...म्हणून या अधिकाऱ्याने कार्यालयात लावला 'मी प्रामाणिक आहे' असा फलक - a board
तेलंगाणामध्ये असा एक अधिकारी आहे. ज्याने आपल्या कार्यालयातच 'मी प्रामाणिक आहे', असा मोठा फलक लावला आहे.
तेलंगाणामधील करीमनगर येथील विद्युत मंडळामध्ये अतिरिक्त विभागीय अभियंता म्हणून अशोक पोदेती काम करतात. त्यांना रोज कोणी ना कोणी आपले काम पुर्ण करुन घेण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करत होते. या गोष्टींना कंटाळून त्यांनी आपल्या कार्यालयातच 'मी प्रामाणिक आहे', असा फलक लावला आहे. लाल फलकावर त्यांनी इंग्रजी आणि तेलुगू या 2 भाषांमध्ये हा संदेश लिहला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी हा फलक लावला आहे. सोशल माध्यमांवर त्यांच्या कार्यालायाचे छायाचित्र व्हायरल होत आहे.
अनेक जणांनी आपले काम पुर्ण करून घेण्यासाठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी लाच घेत नाही, असे सांगून मी थकलो होतो. त्यानंतर मला फलक लावण्याची कल्पना सुचली. जेणेकरुन मला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना आधीच कळेल की, मी प्रामाणिक आहे, असे अशोक यांनी सांगितले. गेल्या 14 वर्षांपासून ते या विभागामध्ये काम करत आहेत.