नवी दिल्ली :भारत-चीनमधील तणावावरून काँग्रेसकडून केंद्रातील मोदी सरकारच्या भूमिकेवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास आहे, असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.
पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त प्रत्येक नागरिक भारतीय लष्कराच्या क्षमता आणि शौर्यावर विश्वास ठेवतो. त्यांच्या भ्याडपणाने चीनकडून भारतीय जमिनीवर कब्जा करण्यात आला, ज्यांच्या खोटेपणामुळे यापुढेहीत ते करू शकतील, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.