नवी दिल्ली -कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याबाबत पंतप्रधान मोदी शनिवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिलपर्यंत आहे. हा लॉकडाऊन उठवायचा, सुरू ठेवायचा की, शिथील करायचा याबाबत आज बैठकीमध्ये चर्चा होईल.
पंतप्रधान मोदी आज साधणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याबाबत पंतप्रधान मोदी शनिवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
PM TO INTERACT WITH CMS ON SATURDAY EXTENSION OF LOCKDOWN ON AGENDA
बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या कल्पनेला सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात बुधवारी पंतप्रधानांनी संसदेच्या नेत्यांसोबतही चर्चा केली होती. यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले होते, की लॉकडाऊन काढण्याचा निर्णय जरी घेण्यात आला, तरी तो पूर्णपणे काढून न घेता टप्प्या टप्प्याने काढून घेण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी, जिल्हा प्रशासनांनी आणि तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवण्याबद्दल सुचवले आहे. तसेच, ओडिशाने आणि पंजाबने लॉकडाऊन वाढवले आहे.