नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मध्य प्रदेशात उभारलेल्या रीवा अल्ट्रा मेगा सौर प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या देशाला समर्पित करण्यात येणारी ही आशियातील सर्वात मोठी सौर परियोजना आहे.
750 मेगावॅट क्षमतेचा आशिया खंडातील हा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प आहे. सौर पार्कातील 500 हेक्टर जमिनीवर प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे तीन सौरउर्जा उत्पादन करणारे युनिट आहेत. या प्रकल्पामुळे सीओ-2 बरोबर प्रत्येक वर्षी अंदाजे 15 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल.
सौर प्रकल्प हा मध्य प्रदेश उर्जा विकास निगम लिमिटेड आणि भारतीय सौर ऊर्जा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या रीवा अल्ट्रा मेगा सौर लिमिटेड (आरयूएमएसएल) ने विकसित केला आहे. हा प्रकल्प 2022 पर्यंत नूतनीकरणक्षम उर्जा क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. या प्रकल्पाच्या विकासासाठी आरयूएमएसएलला केंद्रीय वित्तीय सहायतासाठी 138 कोटी रुपये केंद्रीय अर्थसहाय्य म्हणून देण्यात आले आहेत.
दिल्ली मेट्रोसह राज्याबाहेर संस्थात्मक ग्राहकांना पुरवठा करणारा हा पहिला ऊर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दिल्ली मेट्रोला 24 टक्के ऊर्जा मिळणार आहे. तर उर्वरित 76 टक्के पुरवठा मध्य प्रदेशच्या राज्य वितरण कंपन्यांना केला जाणार आहे.