महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून 7 व्या वर्षी देशाला करणार संबोधित - कोरोना विषाणू न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग सातव्या वर्षी देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित केले. लाल किल्ला येथील कार्यक्रमात 'दो गज की दूरी' या प्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल. नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आत्मनिर्भर भारत उपक्रमांवर जोर असण्याची शक्यता आहे.

narendra modi
नरेंद्र मोदी

By

Published : Aug 15, 2020, 5:35 AM IST

Updated : Aug 15, 2020, 10:31 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन सलग सातव्या वर्षी देशाला स्वातंत्र्य दिनानिमित्त संबोधित करणार आहेत. यावर्षीचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा भारत- चीनच्या सीमावर्ती भूभागात सैनिकांची झालेली झटापट,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आत्मनिर्भर भारत उपक्रमांवर जोर असण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी हे लाल किल्ला येथील लाहोर गेट येथे सकाळी 7.18 वाजता दाखल होतील.मोदी यांचे स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सुरक्षा सचिव डॉ.अजय कुमार करतील. यानंतर सुरक्षा सचिव जनरल ऑफिसर कमांडिग दिल्लीचे विजय कुमार मिश्रा यांचा परिचय मोदी यांना करुन देतील.

जनरल ऑफिसर कमांडिग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॅल्युटिंग बेसपर्यंत घेऊन जातील. भारताची 3 सेनादल आणि दिल्ली पोलिसांचे पथक पंतप्रधान मोदी यांना सलामी देईल. यानंतर गार्ड ऑफ ऑनरचा कार्यक्रम होईल. एक अधिकारी आणि नौदल, वायूदल आणि भूदल आणि दिल्ली पोलिसांच्या प्रत्येकी 24 जवानांची तुकडी पंतप्रधांनाना गार्ड ऑफ ऑनर देईल. यावर्षी भूदल गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व करत आहे. लेफ्टनंट कर्नल गौरव येवलकर हे त्याचे नेतृत्व करतील. भूदलाकडून मेजर पलविंदर ग्रेवाल, नौदलाकडून लेफ्टनंट कमांडर के.वी.आर रेड्डी, वायू दलाकडून स्क्वॉड्रन लीडर विकास कुमार आणि दिल्ली पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस उपायुक्त जीतेंद्र कुमार मीना पंतप्रधांना गार्ड ऑफ ऑनर देतील.

गार्ड ऑफ ऑनर कार्यक्रमानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याकडे मार्गस्थ होतील. तिथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन राऊत, भूदलाचे प्रमुख जनरल एम.एम.नरवणे, चीफ ऑफ नावल स्टाफ अॅडमिरल करमबीर सिंह आणि एअर चीफ मार्शल आर.के.एस.बहादुरिया तिथे उपस्थित असतील. पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण केल्यानंतर तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात येईल. द आर्मी ग्रेनेडिअर्स रेजीमेंटल सेंटर मिलिटरी बॅंड राष्ट्रगीत सादर करणार आहे. या बँडचे नेतृत्व मेजर अब्दुल गणी करणार आहेत. मेजर श्वेता पांडे ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमाच मोदींना सहकार्य करतील. ध्वजारोहणानंतर तिरंगा झेंड्याला सलामी 21 बंदुकांच्या फैरी आकाशात झाडून देण्यात येईल. यामध्ये इलाइट 2223 फिल्ड बॅटरीचे जवान सहभागी असतील. याचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल जीतेंद्र सिंह मेहता करतील. गन पोझिशन ऑफिसर म्हणून नायब सुभेदार अनिल चंद काम पाहतील.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला 7 व्यावर्षी संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांचे भाषण संपल्यानंतर राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रगीताचे गायन करणार आहे. मोदींच्या भाषणात कोरोना प्रसार रोखण्यासाठी केलेले कार्य, आत्मनिर्भर भारत, अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठीचे प्रयत्न याचा समावेश असू शकतो.

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला 110 अति महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मागील वर्षी 440 अतिमहत्वाच्या व्यक्ती स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करत 4 हजार जण स्वांतत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहतील.

नरेंद्र मोदी देशाला काय संबोधन करणार याकडे लक्ष लागले आहे. लाल किल्ला येथील कार्यक्रमात 'दो गज की दूरी' या प्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ला येथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. लाल किल्ला परिसरात 300 कॅमेरे लावण्यात आले असून सुरक्षा दलांचे 4 हजार तेथे तैनात करण्यात आले आहेत.

Last Updated : Aug 15, 2020, 10:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details