नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक जुनी कविता गुजरातमधील एका लेखकाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अर्थ दिना'च्या निमित्ताने आपली जूनी कविता पुन्हा शेअर केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी फेसबूक युजरचे आभार मानले आहेत.
...म्हणून मोदींनी मानले 'या' फेसबूक युजरचे आभार! - अर्थ दिन
अर्थ दिना'च्या निमित्ताने आपली जूनी कविता पुन्हा शेअर केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी फेसबूक युजरचे आभार मानले आहेत.
लेखक किशोर मकवाना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कविता आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली. त्यावर मोदींनी टि्वट करत किशोर यांचे आभार मानले. मी ही कविता बर्याच वर्षांपूर्वी लिहिली होती. 'ही कविता जगातील भव्यता आणि सौंदर्य दर्शवते. पृथ्वी दिनाच्या दिवशी या कवितेची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद', असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुशल राज्यकर्ते असून त्यासोबतच ते एक कवी देखील आहेत. त्यांच्या लेखणीतून अनेक कविता उतरलेल्या आहेत. साक्षी भाव हा मोदींचा कवितांचा संग्रह आहे. 2015 मध्ये हा संग्रह प्रकाशित झाला होता.