महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली.. - मोदी गांधी श्रद्धांजली

दिल्लीच्या राजघाटावर उपस्थित राहत, पंतप्रधानांनी गांधींना श्रद्धांजली वाहिली. एक मजबूत, सक्षम आणि समृद्ध देश बनण्यासाठी राष्ट्रपिता गांधीजी भारतीयांना कायम प्रेरित करत राहतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

PM pays tributes to Mahatma Gandhi on his death anniversary
महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली..

By

Published : Jan 30, 2020, 12:16 PM IST

नवी दिल्ली -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दिल्लीच्या राजघाटावर उपस्थित राहत, पंतप्रधानांनी गांधींना श्रद्धांजली वाहिली. एक मजबूत, सक्षम आणि समृद्ध देश बनण्यासाठी राष्ट्रपिता हे भारतीयांना कायम प्रेरित करत राहतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली..

यासोबतच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, डिफेन्स स्टाफचे प्रमुख बिपिन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, नौदलाचे प्रमुख अ‌ॅडमिरल करमबीर सिंह, आणि हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस. भादुरिया यांनीही गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतरिम प्रमुख सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही त्याआधी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा : कोरोना विषाणू : भारतात २१ विमानतळांवर 'थर्मल स्कॅनिंग' सुरू..

ABOUT THE AUTHOR

...view details