महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'एक राष्ट्र एक निवडणूक'वर मोदी आग्रही; पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक - DMK

या बैठकील बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्र अरविंद केजरीवाल तथा द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

By

Published : Jun 19, 2019, 10:26 AM IST

Updated : Jun 19, 2019, 11:14 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक राष्ट्र एक निवडणूक' यासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) सर्वपक्षीय सदस्यांची एक बैठक आयोजीत केली आहे. यापूर्वीही मोदी यांनी नवनिर्वाचीत लोकसभा सदस्यांची एक बैठक रविवारी आोयोजीत केली होती. पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील मोदींची ही दुसरी सर्वपक्षीय बैठक आहे.

आज आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत संसदेतील सर्व पक्षांच्या पक्षप्रमुखांना सरकारसोबत 'एक राष्ट्र एक निवडणूक' यासह संसदीय अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या अन्य विधेयकांसबंधी चर्चा करण्यात येणार आहे. मोदींच्या या निर्णयाचे ओडीशातील सत्तारूढ पक्ष बिजू जनता दलाने समर्थन केले आहे. मात्र, काही पक्षांच्या सदस्यांनी हा प्रकार अव्यवहारीक असल्याचे म्हटले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत सहभागी होण्यास थेट नकार दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी इतक्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी फक्त एक दिवस चर्चा करणे पुरेसे ठरणार नाही, असे म्हटले आहे.

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त सरकार आखत असलेल्या योजना आणि संसदीय कामकाज शांततेत पार पडावे यासाठी मोदी या सभेत चर्चा करणार असल्याचे समजते.

दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष यांनी पंतप्रधान मोदींनी आयोजीत केलेल्या 'एक राष्ट्र एक निवडणूक' या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीत सहभागी होणार की नाही याबद्दल अजून भूमिका स्पष्ट केली नाही. आज (बुधवारी) पक्षाच्या कार्यकरीणीद्वारे हा निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान, काँग्रेसच्या संसदीय नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी सांयकाळी एक काँग्रेस सहकारी पक्षांची एक बैठक आयोजीत केली होती. मात्र, या बैठकीत 'एक राष्ट्र एक निवडणूक' या विषयावर कोणताही निर्णय झाला नाही.

Last Updated : Jun 19, 2019, 11:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details