नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधीची १५० वी जयंती जगभरामध्ये उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
गांधी @ १५०: पंतप्रधानांनी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली - गांधी @ १५०
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
गांधी @ १५०
गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी राजघाट येथे गर्दी केली आहे. गांधीजींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी 'साबरमती रिव्हरफ्रंट' येथे जाणार आहेत. तेथे पंतप्रधान हागणदारीमुक्त भारताची घोषणा करणार आहेत.
आज भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील जयंती आहे. त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि बड्या नेत्यांनी विजयघाट येथे श्रद्धांजली अर्पण केली.
Last Updated : Oct 2, 2019, 9:46 AM IST