नवी दिल्ली - प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या संगीताने अनेक गाण्यांना अजरामर बनवले. चित्रपट आणि कला क्षेत्रातील त्यांचे योगदान सतत स्मरणात राहील, अशा शब्दात मोदींनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
खय्याम यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान सतत स्मरणात राहील - नरेंद्र मोदी - फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित
प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
खय्याम यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच सुजय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली या चित्रपटाची गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. कभी कभी, उमराव जान, फिर सुबह होगी अशा सुपरहिट चित्रपटांना त्यांना संगीत दिले. कभी कभी व उमराव जान या दोन चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.