नवी दिल्ली -कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या भारतात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून कुणीही घाबरू नये, सर्वांनी मिळून एकत्र कार्य करावे, असे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणू संबधित परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला. विषाणूवर देशातील मंत्री आणि राज्य एकत्र काम करत आहेत. भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी होत असून त्यांना निरक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. आपल्या सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे, असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच त्यांनी विषाणूची लागण होऊ नये, यासाठी काही प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत.