कोलकाता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज (11 जानेवारी) कोलकाता शहरात आहेत. या भेटीदरम्यान, सीएए आणि एनआरसी मागे घेण्यात यावा, अशी मागणी ममता यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.
'सीएए-एनआरसी मागे घ्या' पंतप्रधान मोदींकडे ममता बॅनर्जी यांची मागणी - कोलकाता पोर्ट ट्रस्ट 150 वा वर्धापन दिन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवनात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या कोलकाता दौर्यावर आहेत. नरेंद्र मोदी शहरात दाखल होण्यापूर्वी लोक कोलकाता विमानतळाजवळ आंदोलन करत होते. मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीएए आणि एनआरसीचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वत्र आंदोलने होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजभवनात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या कोलकाता दौर्यावर आहेत. नरेंद्र मोदी शहरात दाखल होण्यापूर्वी लोक कोलकाता विमानतळाजवळ आंदोलन करत होते. मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सीएए आणि एनआरसीचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वत्र आंदोलने होत असल्याचे पहायला मिळत आहे. एसएफआय (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) या विद्यार्थी संघटनेनेदेखील पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचा निषेध नोंदवत आंदोलन केले आहे.