महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrayaan 2: इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधानांनी केले सांत्वन - isro chief k sivan broke down

चांद्रयान मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ गेल्यानंतर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यामुळे सर्व शास्त्रज्ञांचा आणि देशाचा हिरमोड झाला. मात्र, अजूनही विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा जिवंत आहे.

पंतप्रधान मोदी, के. शिवन

By

Published : Sep 7, 2019, 10:16 AM IST

Updated : Sep 7, 2019, 11:58 AM IST

बंगळुरु - अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ गेल्यानंतर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यामुळे सर्व शास्त्रज्ञांचा आणि देशाचा हिरमोड झाला. मात्र, अजूनही विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा जिवंत आहे.

'चांद्रयान 2' मोहीम अंतिम टप्प्यावर असताना अचानक आलेल्या या समस्येमुळे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना अक्षरश: रडू कोसळले. इस्रोच्या कंट्रोल रुममधील संबोधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर आले. त्यांना निरोप देताना सिवन यांना अश्रू अनावर झाले. यावेळी, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांना कवटाळून धरले. सिवन यांच्या पाठीवर थोपटत मोदींनी त्यांना धीर दिला. अखेर सिवन यांनी डबडबललेल्या डोळ्यांनीच पंतप्रधानांना निरोप दिला.
Last Updated : Sep 7, 2019, 11:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details