महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अशोका हॉटेलमध्ये रालोआच्या नेत्यांची मांदियाळी, पंतप्रधान मोदींचेही आगमन - Ashoka

दिल्लीतील अशोका हॉटेल येथे रालोआचे पक्ष प्रमुश जेवणासाठी एकत्र आले आहेत. कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार उपस्थित झाले आहेत.

अशोका हॉटेलमध्ये रालोआच्या नेत्यांची मांदियाळी, पंतप्रधान मोदींचेही आगमन

By

Published : May 21, 2019, 8:53 PM IST

Updated : May 21, 2019, 10:45 PM IST

नवी दिल्ली - एग्जिट पोलच्या निकालानंतर रालोआतील विविध पक्षांचे नेते रात्रीच्या जेवणासाठी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये येत आहेत. आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले आहे. रालोआच्या इतर सदस्यांनी मोदी यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार उपस्थित झाले आहेत. अशोका हॉटेलमध्ये सायंकाळी ७.३० पासून रालोआचे नेते एकत्र येत आहेत. तमिलनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी, लो.ज.पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे प्रतिनिधित्व शिरोमणि अकाली दलाचे नेते तसेच मैजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि पक्षाचे नेते सुखबीर सिंह बादल करत आहेत.

Last Updated : May 21, 2019, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details