नवी दिल्ली - ''२०२० हे वर्ष सुरू झाले तेव्हा कोणी कोरोनासारखी महामारी येईल याचा विचारही केला नव्हता. भारतातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी ‘भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ला (USISPF) संबोधित केले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
'भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम'ला पंतप्रधान मोदींनी केले संबोधित; म्हणाले...
मोदी यांनी ‘भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ला (USISPF) संबोधित केले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, ''या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनासारखी महामारी येईल असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु या व्हायरसचा जगात परिणाम झाला. ही महामारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आर्थिक प्रणालीची परीक्षा घेत आहे. सद्यस्थितीत विकासाठी मानव केंद्रीत दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. महामारीमुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. परंतु ही महामारी भारतीयांच्या आकांक्षांवर परिणाम करू शकणार नाही. भारतात कोरोनापासून बरे होण्याचा दरही वेगाने वाढत आहे. देशातील व्यावसायिक, उद्योजकही उत्तम काम करत आहेत. भारत हा आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पीपीई किट तयार करणार देश ठरला आहे.''
मोदी पुढे म्हणाले, ''पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही काम सुरू आहे. जगातील सर्वात मोठ्या हाऊसिंग प्रोग्रामवरही काम सुरू आहे. रेल्वे, रोड, एअर कनेक्टिव्हीटी वाढवली जात आहे. ग्लोबल सप्लाय चेन विकसित करण्यासाठी विश्वास महत्त्वाचा असल्याचे कोरोनाने दाखवून दिले आहे. एका बाजूला कोरोनाचे संकट समोर असताना दुसरीकडे भारताने दोन चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांनाही तोंड दिले आहे. सध्या भारतात ८० कोटी जनतेला मोफत धान्य पुरवले जात आहे. शिवाय, ८० दशलक्ष लोकांना मोफत स्वयंपाकाचा गॅसही दिला जात आहे.''